औरंगाबाद- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशाने आज औरंगाबाद लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती होत आहेत सर्वच इच्छुकांची नावे आपण पक्षश्रेष्ठींसमोर ठेवणार आहोत. त्यातील ज्याही एका उमेदवाराची निवड होईल त्यांच्या पाठिशी सर्वांनीच उभे राहायचे आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष आ. अब्दुल सत्तार यांनी केले.
गांधी भवनात
आयोजित या कार्यक्रमात जालना येथून आलेले निरीक्षक भीमराव डोंगरे, औरंगाबाद
शहराध्यक्ष नामदेव पवार, माजी आमदार नितीन पाटील, जि.प. उपाध्यक्ष केशवराव तायडे, कन्नड तालुका
अध्यक्ष बाबासाहेब मोहिते, खुलताबादचे तालुका अध्यक्ष अनिल श्रीखंडे, काँग्रेस
सेवादलचे प्रदेश अध्यक्ष विलास औताडे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भोसले तसेच नसीर नजीर खान, मुजफ्फर खान, साहेबराव बनकर
आदींची उपस्थिती होती.
या मुलाखतीसाठी
काही इच्छुक उमेदवारांनी काही तालुकाध्यक्ष व समर्थकांनी उमेदवारी द्यावी म्हणून
अर्ज करण्यात आले आहेत. त्यांची नावे आ. अब्दुल सत्तार यांनी वाचून दाखवली.
यामध्ये कल्याण काळे, नामदेव पवार, प्रा. रवींद्र बनसोड, सुभाष झांबड, मिलिंद पाटील, इब्राहीम पठाण, अरुण दापकेकर, पृथ्वीराज पवार, प्रा. मोहन देशमुख, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांच्या नावाचा
समावेश आहे. त्यानंतर प्रत्येक इच्छुक उमेदवाराने आपले मनोगत व्यक्त केले.
दुपारच्या सत्रात या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात येतील.